कोल्हापूर- लाडका गणपती बाप्पा आता दोन दिवसातच घरी येणार आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी आबालवृद्ध उत्सुक आहेत. गणपती येण्याआधीच चार पाच दिवस बाप्पासाठी मकर, सजावटीला सुरवात होते. यंदा लॉकडाऊनमुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप वेळ मिळाला. या वेळेचा सदुपयोग करत आता घराघरात सजावट, मकर करण्याची घाई सुरू झाली आहे. अनेकांनी इकोफ्रेंडली, फोम, रद्दी आणि कागदाचा वापर करून घरच्या घरी मकर तयार केले. अशाच अनोख्या सजावटी पहा या व्हिडीओच्या माध्यमातून.
व्हिडिओ - मोहन मेस्त्री